'भारताचा पाकिस्तानला बदनाम करण्याचा डाव'

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट आढळल्याचं नुकतंच समोर आलंय. यावर पाकिस्ताननं मात्र कानावर हात ठेवलेत. 

Updated: Jan 3, 2015, 04:04 PM IST
'भारताचा पाकिस्तानला बदनाम करण्याचा डाव' title=

नवी दिल्ली : गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट आढळल्याचं नुकतंच समोर आलंय. यावर पाकिस्ताननं मात्र कानावर हात ठेवलेत. 

पाकिस्तानच्या बोटी गुजरात तटानजिक आढळून आल्याचा भारताचा दावा पाकिस्ताननं फेटाळून लावलाय. पाकिस्तानच्या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता तसनीम असलम यांनी कराचीकडून कोणतीही बोट भारताच्या दिशेने गेली नसल्याचं म्हटलंय. 

उलट पाकिस्ताननंच भारतावर आरोप केलेत. भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याच्या हेतूनं या हरकती करत असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. 

धक्कादायक म्हणजे, नुकतीच पाकिस्तानी बोट गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१४ रोजी आढळून आली  होती. या बोटीवर चार जण स्वार होते, अशी माहिती समजतेय. पोरबंदरच्या किनाऱ्यापासून ३६५ किलोमीटर दूरवर ही बोट भारतीय कोस्ट गार्डला आढळून आली होती. कोस्ट गार्डनं या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून दिलं, असा खुलासा गुप्तचर संस्थेच्या अहवालात करण्यात आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.