मोदी भेटले इंग्लडच्या राणीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी इंग्लडची राणी एलिझाबेथची भेट घेतली.. पंतप्रधानांसाठी राणी एलिझाबेथनं बंकीगहॅम पॅलेसमध्ये मेजवानीचं आयोजन केल होतं. यावेळी मोदी यांनी राणीला १९६१ ला त्या भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळचे फोटो भेट दिले. तसेच त्यांना एक बनारसी शालही भेट दिली. 

Updated: Nov 13, 2015, 10:47 PM IST
मोदी भेटले इंग्लडच्या राणीला  title=

लंडन  : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी इंग्लडची राणी एलिझाबेथची भेट घेतली.. पंतप्रधानांसाठी राणी एलिझाबेथनं बंकीगहॅम पॅलेसमध्ये मेजवानीचं आयोजन केल होतं. यावेळी मोदी यांनी राणीला १९६१ ला त्या भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळचे फोटो भेट दिले. तसेच त्यांना एक बनारसी शालही भेट दिली. 

यानंतर मोदींसाठी विशेष लंचचं आयोजन करण्यात आलंय.. त्यानंतर मोदी लंडनच्या वेम्बली स्टेडियम इथून 90 हजार नागरिकांशी संवाद साधतील,... 

फुटबॉल सामन्य़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेम्बली स्टेडीयममध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलीय.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.