मलेशियन `एमएच 370` हे विमान थायलंड सैन्यानंच पाडलं?

मलेशियाचं बेपत्ता विमान `एमएच 370` पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण `द मिस्ट्री` नावाच्या एका नवीन पुस्तकात `एमएच 370` विमान हे सेनेच्या कारवाईत पाडलं गेल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Updated: May 19, 2014, 04:15 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, लंडन
मलेशियाचं बेपत्ता विमान `एमएच 370` पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण `द मिस्ट्री` नावाच्या एका नवीन पुस्तकात `एमएच 370` विमान हे सेनेच्या कारवाईत पाडलं गेल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
पुस्तकात सांगण्यात आलं आहे की, थायलँड आणि अमेरिकेच्या अभ्यास मोहिमेदरम्यान हे विमान चुकून निशाण्यावर आलं. नंतर मात्र या विमानाला हवेतच उडवून टाकण्यात आलं. या विमानाचे सगळे अवशेष नेस्तनाबूत करण्यात आले आणि त्यांना प्रशांत महासागरात पाडण्यात आलं.
पुस्तकात अशी शंका निर्माण करण्यात आली आहे की, या विमानाचे इतके तुकडे झाले आहेत की, त्यांना यंत्रणेनं शोधणं देखिल नामुष्कीचं होऊन बसलं आहे.
पुस्तकात केलेल्या दाव्यानूसार, थायलँड आणि अमेरिकेच्या जमीन, हवा आणि पाणी या भागांवर सैन्याचा अभ्यास सुरू होता. या वेळी थायलँडच्या एका सैनिकानं विमानावर अचानक गोळी चालवली. यानंतर हे विमान पाडण्यात आलं. काही वेळानं विमानाला रडारवरून गायब करण्यात आलं. पण एका थायलँडच्या नागरिकाने हे जळत असलेलं विमान थायलँडच्या खाडीत पडताना पाहिलं होतं.
या विमानात १४ देशांचे २३९ नागरीक प्रवास करत होते. पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, प्रवाशांचे नातेवाईक कधीच आपल्या लोकांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेऊ शकणार नाही. कारण शोध मोहीम करणाऱ्या यंत्रणांनी प्रशासनाला चुकीची माहिती दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.