www.24taas.com, झी मीडिया, पॅटागोनिया
जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.
पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह हे गाव फ्लेचा या वाळवंटी प्रदेशात येते. हा डायनासॉर शाकाहारी गटातील असून 77 टन वजनाचा असू शकतो. तसेच या डायनासॉरची मान ही 20 मीटर उंच असू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या डायनासॉरच्या पायाचे हाड हे एका पुरूषाच्या उंची इतके आहे.
त्रिलीव्ह गावातील स्थानिक शेतमजुराला डायनासॉरची हाड सापडली. यानंतर जीवाश्म वस्तुसंग्रहालयाचे डॉ. लुईस कार्बालिडो आणि डॉ. डिएगो पोल यांनी त्रिलिव्हमध्ये पाहणी करून खोदकाम सुरू केले आहे. उत्खननात साधारणपणे 150 हाडे ही सुस्थितीत सापडली आहेत. हाडांचा अंदाज घेऊन हा डायनासॉर किती वर्ष जुना असेल याचा अंदाज काढण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.