नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट होणार आहे. अगदी काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
रशियातल्या ऊफा या शहरात दोन्ही देशातल्या ताणल्या गेलेल्या संबंधांबद्दल चर्चा अपेक्षित आहे. यावेळी पाकनं गेल्यावर्षभरात वारंवार केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल चर्चा अपेक्षित आहे.
याशिवाय २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमांईट झकी उर रहमान लक्वीला पाक कोर्टानं दिलेल्या जामीनाबद्दलही भारत निषेध व्यक्त करण्याची शक्यता आहे.
रशियातल्या ऊफा शहरात आज 'शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन'च्या नेत्यांची शिखर परिषद होतेय. या संघटनेत भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आलाय.
मोदींच्या शपथविधीला शरीफ यांची उपस्थितीत, आणि त्यानंतर मोदी-शरीफ यांच्यात प्रस्थापित झालेल्या सलोखा वर्षभरापूर्वी बराच चर्चेत आला. पहिला भेटीतच भारत-पाक संबंध सुधारण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला होता. पण पाकनं काश्मीरमधल्या फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांशी स्वतंत्र बातचीत करण्याचा घाट घातला. त्यावर भारतानं तीव्र निषेध व्यक्त करून पाकशी होणाऱ्या सगळ्या चर्चा थांबवल्या. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदी-शरीफ भेटीत काय चर्चा होते याकडे लक्ष लागून राहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.