मोसूल : रमजान निमित्ताने सांयकाळी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, अन्नातून विषबाधा झाल्याने इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी पडलेत. मोसूल, सीरिया येथे ही घटना घडली. भोजनासाठी १४५ दहशतवाद्यांना बोलविण्यात आले होते.
मोसूल, सीरिया येथे रमजान निमित्ताने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोणीही जाणून बुजून अन्नातून विष घातले नाही, असे स्पष्टीकरण आयएसच्या प्रवक्त्यांने सांगितले. तर इराकी मीडिया कुर्द डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. रमजान असल्याने इसिसच्या दहशतवाद्यांना भोजनासाठी बोलविले होते, हे स्पष्ट केले.
दरम्यान, १४५ इसिसचे दहशतवाद्यांनी भोजनाचा लाभ घेतला. यातील ४५ जण मरण पावलेत. तर १०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.