टोकिओ : जपानच्या दक्षिण ओकिनावा बेटावर नेवगुरी नावाच्या प्रचंड वादळाच्या तडाख्यात सापडलंय.
यामुळेच, जवळपास पाच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळावर जाण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. गेल्या काही वर्षांतील अत्यंत भयंकर म्हणून हे वादळ ओळखलं जातंय. यामुळे अनेक इमारतींना तडे गेलेत... काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्यात... झाडं उन्मळून पडलीत आणि विमान तसंच समुद्रातील वाहतूक ठप्प झालीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळाचे वेग 252 किलोमीटर प्रती तासापर्यंत पोहचलाय. यामुळेच, मुसळधार पाऊस झालाय. अनेक विमानं रद्द करण्यात आलेत. आत्तापर्यंत अनेक जण जखमी झालेत.
राजधानी नाहामध्ये ट्रॅफिक लाईटसदेखील बंद पडल्यात. टीव्हीवरून दिसणाऱ्या दृश्यांवरून इथं किती हाहाकार: उडालाय याची झलक पाहायला मिळतेय.
ओकिनावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन जण जखमी झालेत. तर सरकारी प्रसारक ‘एनएचके’नं जखमींची संख्या आठवर गेल्याचं सांगितलंय. इथल्या शाळा बंद आहेत. ओकिनावातील जवळपास 70,000 घरांतील वीजही गायब आहे.
जपानच्या हवामान विज्ञान एजन्सीकडून ओकिनावाच्या मुख्य बेटासहीत मियाके बेटालाही उच्च वादळाचा अलर्ट जाहीर करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.