हर्नडन: भारतीय इंजिनिअर्सना जर संधी दिली तर भारतीय रेल्वेही 300 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं धावू शकते. हे आम्ही नाही तर कोकण रेल्वेचे पूर्व प्रबंध निदेशक आणि प्रसिद्ध विशेषज्ज्ञ बी. राजाराम यांनी म्हटलंय. मात्र यासाठी भारतीय रेल्वेला आपला नेहमीचा खाक्या सोडावा लागेल.
अमेरिकेच्या हर्नडनमध्ये एका इंटरव्यूमध्ये राजाराम यांनी सांगितलं, “आमचे तरुण इंजिनिअर सुरक्षा आणि सामर्थ्यासोबत वेगवान रेल्वे चालवू शकण्यसाठी सक्षम आहेत. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला हवी आणि सोबतच त्यांना संधी मिळायला हवी.”
भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी वेळ देणारे राजाराम म्हणाले, भारतीय इंजिनिअर युरोप, चीनची नक्कल न करता असं करू शकतात आणि त्यासाठी त्यांच्यावर मॉडेल बनवण्यासाठी विश्वास ठेवायला हवा. राजाराम यांनी परदेशी तंत्रज्ञान न मागवता भारतीय पद्धतीनं कमी खर्चात रेल्वेचा वेग वाढवून इतिहास रचलाय.
राजाराम यांनी कोकण रेल्वे सुरू करतांनाच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “2003मध्ये मडगांव (गोवा) आणि रोहा (मुंबई जवळील) दरम्यान मी यशस्वीरित्या 150 किलोमीटर प्रति तासापासून 400 किलोमीटरपर्यंत एक रेल्वे चालविली होती. ही एक ट्रायल होती. तोपर्यंत इतक्या लांबपल्ल्यावर जलद गतीनं रेल्वे चालविली नव्हती.” 442 किलोमीटर अंतर कापायला एका सुपरफास्ट गाडीला जवळपास नऊ तास लागतात, तिथं मी हे अंतर अवघ्या साडे तीन तासांत पूर्ण केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.