जपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा

आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

PTI | Updated: Nov 22, 2016, 07:53 AM IST

टोकियो : आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज पहाटे ५.५९ मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का बसला. राजधानी टोकियोपर्यंत जाणावलेल्या या भूकंपाचे केंद्र फुकूशीमा किनाऱ्या जवळच्या समुद्रात १० किमी खोलीवर होते.

भूकंपनानंतर टोहोकू कंपनी फुकूशीमा येथे विजनिर्मिती करणारे अणुऊर्जा केंद्राची तपासणी करत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. तर टीव्ही फुटेजेसमध्ये फुकूशिमा किनाऱ्यावरील जहाजे भूकंपनानंतर पाण्यावर हेलकावे खाताना दिसली. 

दरम्यान, या भूकंपनानंतर लगेचच हवामान खात्याने ३ मीटरपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा किनाऱ्याला धडकण्याचा इशारा दिला आहे. तसेच स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.