मृत्यूनंतर 'तिचा' मृतदेह डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याचा कोर्टाचा निर्णय

ब्रिटनमध्ये एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीनं कँन्सरनं मृत्यूपूर्वी आपला मृतदेह डीप फ्रीजमध्ये अर्थातच बर्फात ठेवण्याची लढाई न्यायालयात जिंकली. 

Updated: Nov 21, 2016, 10:07 PM IST
मृत्यूनंतर 'तिचा' मृतदेह डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याचा कोर्टाचा निर्णय title=

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीनं कँन्सरनं मृत्यूपूर्वी आपला मृतदेह डीप फ्रीजमध्ये अर्थातच बर्फात ठेवण्याची लढाई न्यायालयात जिंकली. 

इंग्लंडमधल्या एका कॅन्सर पीडीत मुलीनं मृत्यूनंतर आपला मृतदेह पुरण्याऐवजी डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती. जेव्हा आपल्या आजाराचं औषध मिळेल त्यावेळी तिला पुन्हा जिवंत करता येईल, अशी या मुलीला आशा होती.

अत्यंत धक्कादायक अशा या घटनेत या मुलीच्या मृत्यूच्या अकरा दिवस आधी कोर्टानं आपला निकाल तिच्या बाजून दिला, अशी माहिती मुलीचे वकील रॉब जॉर्ज यांनी दिलीय. कायदेशीर कारणांमुळे या मुलीचं आणि तिच्या आई-वडिलांचं नाव सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. 

'क्रायो प्रिझर्वेशन'

'क्रायो प्रिझर्वेशन'मध्ये माणसाच्या मृत्यूनंतर दोन ते 15 मिनिटांच्या आत ही प्रक्रिया सुरु केली जाते. शरिरात रक्ताच्या गुठळ्या बनण्यापासून थांबवण्यासाठी विशेष प्रकारचं रसायन मृतदेहामध्ये भरलं जातं. या रसायनांना बर्फामध्ये पॅक केलं जातं. मृतदेहाला 130 डिग्री सेल्सियवर ठेवण्यात येतं. मृतदेहाला एका कंटेनरमध्ये लिक्विड नायट्रोजन गॅसच्या टँकमध्ये भरलं जातं. यानंतर 196 डिग्री सेल्सियसवर मृतदेहाला सुरक्षित केलं जातं.

मात्र, क्रायो प्रिझर्वेशन तंत्रज्ञान ब्रिटनमध्ये विकसीत नसल्यानं या मुलीचा मृतदेह आता अमेरिकेत पाठवण्यात आलाय.