भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान

तुम्हाला जर पंतप्रधान केलं तर ?

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 1, 2016, 05:14 PM IST
भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान title=

नवी दिल्ली : अनेक स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला जर पंतप्रधान केलं तर तुम्ही काय करणार ? असा प्रश्न विचारला जातो. पण वास्तवात खरंच जर तुम्हाला एक दिवसासाठी पंतप्रधान बनवलं तर...? असं झालं तर तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. पण नायक सिनेमासारखं रिअल लाईफमध्ये ही हे एका युवकासोबत घडलं आहे. 

मुळचा पंजाबचा राहणारा प्रभजोत लखनपाल याला कॅनडाचा पंतप्रधान होण्य़ाचा मान मिळाला आहे तो एक दिवसासाठी नाही तर एका आठवड्यासाठी. अडीच वर्षापूर्वी कँसरला झुंज देत असतांना मेक अ विश फाऊंडेशन या संस्थेने त्याला त्याची इच्छा विचारली होती, त्यावेळेस त्याने कॅनडाचा पंतप्रधान होण्याची इच्छा होण्याची इच्छा दर्शवली होती.

प्रभजोत लखनपाल हा उपचारांमुळे चांगला झाला आणि तो घरी आला. त्याने बोलून दाखवलेली इच्छा तो विसरला पण मेक अ विश फाऊंडेशन ही गोष्ट विसरला नाही. या संस्थेने कॅनडा सरकारला एका आठवड्यासाठी प्रभजोतला पंतप्रधान करण्याचं आग्रह केला आणि त्याला सरकारने खरंच एका आठवड्यासाठी कॅनडाचा सर्वोच्च स्थानावर बसण्याचा मान दिला. प्रभजोत हा मुळचा भारतीय असून त्याचं कुटुंब मंडी अहमदगढ येथील राहणारा आहे.