बाप लेक आणि मुलाचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला

कॅरल्टन (टेक्सास) : २९ फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो.

Updated: Mar 1, 2016, 03:14 PM IST
बाप लेक आणि मुलाचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला  title=

कॅरल्टन (टेक्सास) : २९ फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो. अशा व्यक्तींना नेहमीच खास वाटत असणार यात काही शंका नाही. आपल्या वाढदिवसाची खरी तारीख चार वर्षांतून चार वर्षांतून येणं ही तशी दुर्मिळ बाब. पण, अमेरिकेतील एका कुटुंबात मात्र चक्क तिघांचा वाढदिवस एकाच तारखेला आहे आणि ती तारीख म्हणजे २९ फेब्रुवारी.

अमेरिकेतील टेक्सास राज्यात राहणाऱ्या कॅसे हॅन यांच्या कुटुंबात त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा जन्म २९ फेब्रुवारीला येतो. पण, विशेष म्हणजे त्यांना २०१६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात एक मुलगी झाली आणि ती पण २९ फेब्रुवारीला. या सर्व घडामोडी कोणीही जाणून बुजून केलेल्या नाहीत, तर हा निव्वळ योगायोगाचा भाग आहे असं कॅसे हॅन यांचं म्हणणं आहे. 

त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या पत्नीला २९ फेब्रुवारीलाच प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि त्यांनी पहिला मुलगा झाला. आता चार वर्षांनी त्याला मुलगी होणार तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पत्नीची सिझेरिअन ऑपरेशनची तारीखही योगायोगाने २९ फेब्रुवारी हीच ठरवली.

'२९ फेब्रुवारीला वाढदिवस असल्याने २८ फेब्रुवारीला फेसबूक माझा वाढदिवस उद्या आहे असं दाखवतं खरं, पण १ मार्चला मात्र माझा वाढदिवस दिसत नाही की मला कोणी शुभेच्छा देत नाही,' असं त्याने फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

यापुढे मात्र चार वर्षांतून एकदा जेव्हा घरातील तिघांचे वाढदिवस एकाच दिवशी येतील तेव्हा मात्र आपण जंगी पार्टी करणार असल्याचे कॅसेने ठरवले आहे. त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळीही त्या हॉस्पिटलने एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते.