'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार'

काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

Updated: Nov 20, 2014, 08:21 PM IST
'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार' title=

पॅरिस : काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

'एचएसबीसी'चे माजी अधिकारी हर्वे फल्चियानी यावर बोलतांना म्हणाले, काळ्या पैशाबद्दल मूळ तपशीलाच्या एक टक्कादेखील माहिती भारताकडे नाही. मी इतर काही देशांना याबाबत मदत करीत आहे, आणि भारताला मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे.

भारतातील न्यूज चॅनेलला फ्रान्समधून दिलेल्या मुलाखतीत हर्वे यांनी ही माहिती दिली. जीनिव्हातील 'एचएसबीसी'मध्ये गुप्त खाती असलेल्या हजारो जणांची यादी आठ वर्षांपूर्वी जाहीर केली होती. त्यामध्ये ६०० भारतीयांची नावे होती. 

कोण आहेत हर्वे फल्चियानी?
फ्रान्स सरकारने 'एचएसबीसी'मध्ये बँक खाती असलेल्या भारतीयांच्या नावांची यादी २०११ मध्ये भारत सरकारला दिली होती. 'हे फक्त हिमनगाचे टोक आहे,' असे हर्वे यांनी सांगितले. 'याबाबत भारताने उद्या मदत मागितली तर आम्ही उद्याच प्रस्ताव देऊ' असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

४२ वर्षीय हर्वे आता अमेरिका, स्पेन, फ्रान्स आणि बेल्जियम असा देशांना करचुकवेगिरी, सावकारी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करीत आहेत. 

हर्वे हे जिनिव्हास्थित 'एचएसबीसी'मध्ये सिस्ट इंजिनीअर म्हणून काम करीत होते. हर्वे यांनी स्विस बँकांच्या इतिहासातील सुरक्षेचे सर्वांत मोठे उल्लंघन केलं होतं, यात त्यांनी एक लाख २७ हजार खात्यांची माहिती मिळवली, आणि ती २००८ मध्ये फ्रान्स सरकारला दिली, यावरून त्यांना तुरूंगवास देखिल भोगावा लागला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.