भारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत व्हावेत आणि आर्थिक आणि सुरक्षेमध्ये भागीदारीचं आवाहन करत दोन्ही देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Apr 8, 2017, 07:03 PM IST
भारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत व्हावेत आणि आर्थिक आणि सुरक्षेमध्ये भागीदारीचं आवाहन करत दोन्ही देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत जॉइंट स्टेटमेंटमध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, बांग्लादेश सरकारची दहशतवादा विरोधातील झिरो टॉलरेंसची पॉलिसी सगळ्यांसाठी आदर्श आहे. दोन्ही देशांमध्ये एकूण २२ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दोन्ही देशांना दहशतवादावर विजय मिळवायचा आहे. दोन्ही देशांना आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्याची गरज आहे. आपल्याला कमर्शल संबंध पुढच्या पायरीवर नेण्याची गरज आहे. 

पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशला ४.५ अरब डॉलर म्हणजेच जवळपास २९ हजार कोटी रुपयांची लाईन ऑफ क्रेडिटची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'भारत आणि बांगलादेश या गोष्टीसाठी प्रतिबद्ध आहे की, दोन्ही देशाच्या सहयोगाने दोन्ही देशांच्या नागरीकांना लाभ होणार आहे. आम्ही ऊर्जा, सायबर सेक्युरिटी, सिविल न्यूक्लियरसह अनेक क्षेत्रामध्य़े सहयोग वाढवत आहोत.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'आमच्या कंपन्या बांग्लादेशच्या कंपन्यासोबत मिळून तेल निर्यातवर कार करत आहे. आम्ही पुढे या दिशेत अनेक करार करु. आर्थिक मुद्दयांवर भारत बांग्लादेशसोबत प्रत्येक पावलावर एकत्र पुढे जाऊ इच्छितो.'