नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर उत्तर-पूर्व लडाखमधील चुमुर भागात घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांनी माघार घेतल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळताना दिसतोय.
चार दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स आर्मीच्या तीन बटालीयन्स भारताच्या हद्दीत घुसल्या होत्या.. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील शिखर बैठकीच्या काही तासांपूर्वी चिनी सैनिकांनी ही घुसखोरी केली होती.
शिखर बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घुसखोरीबाबत चीनला खडसावल्यानंतर ही चिनी सैन्यानं माघार घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.