ई-सिगारेट पिताना तोंडात झाला स्फोट

ई-सिगारेटचा वापर दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र ही सवय घातक ठरु शकते. जर्मनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ई-सिगारेटचे सेवन करणे चांगलेच नुकसानकारक ठरलेय. 

Updated: Jan 30, 2016, 11:08 AM IST
ई-सिगारेट पिताना तोंडात झाला स्फोट title=

नवी दिल्ली : ई-सिगारेटचा वापर दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र ही सवय घातक ठरु शकते. जर्मनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ई-सिगारेटचे सेवन करणे चांगलेच नुकसानकारक ठरलेय. 

ई-सिगारेट पिताना या व्यक्तीच्या तोंडात स्फोट झाला. यामुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झालीये तसेच त्याच्या तोंडातील दातांनाही इजा झालीये. 

मेलऑनलाइन च्या रिपोर्टनुसार जर्मनीत २० वर्षाचा एक व्यक्ती ई-सिगारेट पित होता. यावेळी त्या सिगारेटच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे व्यक्तीच्या चेहऱ्याला इजा झालीये. यासोबत तोंडातही दुखापत झालीये. 

याआधी दोन आठवड्यांपूर्वी ई-सिगारेटचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. यातून महिला मात्र बचावली होती.