विश्वास बसणार नाही, चक्क हिऱ्यांचा पाऊस बरसतोय!

तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, दोन ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतोय. याचा शोध लागलाय. वैज्ञानिकांना हे हिरे दूरच्या गुरू आणि शनी या ग्रहांवर सापडले आहेत. 

Reuters | Updated: Mar 15, 2016, 04:31 PM IST
विश्वास बसणार नाही, चक्क हिऱ्यांचा पाऊस बरसतोय! title=

वॉशिंग्टन : तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, दोन ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतोय. याचा शोध लागलाय. वैज्ञानिकांना हे हिरे दूरच्या गुरू आणि शनी या ग्रहांवर सापडले आहेत. 

युरेनस व नेपच्यून या ग्रहांच्या गाभ्यात हिरे आहेत हे तीस वर्षांपासून माहीत असले तरी गुरू व शनीवरील स्थिती घन हिऱ्यांना अनुकूल नाही पण ते हिरेच आहेत यात शंका नाही असे संशोधकांचे मत आहे.  

शनी आणि गुरूवर मोठय़ा प्रमाणात हिरे आहेत. त्यांच्या अंदाजानुसार द्रव हायड्रोजन व हेलियम द्रवावर हे हिरे तरंगत आहेत, अशी माहिती ग्रहीय विज्ञानात संशोधन करणाऱ्या व्यक्तींनी दिलेय.

नासाच्या नवीन माहितीनुसार शनीवर हे हिरे नेमके किती खोलवरच्या भागात आहेत हे समजलेले नाही. यातील काही मोठे हिरे असून त्यांना डायमंडबर्ग म्हणजे हिरेनग (हिमनगप्रमाणे) म्हणता येईल. कॅलिफोर्नियातील ग्रहीय वैज्ञानिक मोना एल. डेलिटस्की , विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठाचे केविन एच बेन्स यांनी तेथील कार्बनबाबत जी माहिती गोळा केली त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. 

गुरू व शनी यांच्या दाब-तापमान आकृत्यांच्या आधारे गणन करून त्यांनी असे म्हटले आहे की, या ग्रहांच्या खोलवरच्या भागात हिरे आहेत. जिथे हे हिरे आहेत तिथे हे हिरे वितळलेले आहेत व तेथे हिऱ्यांच्या द्रवाचा पाऊस पडतो.

डेलिटस्की व बेन्स यांच्या मते कार्बनची काजळी, ग्राफाइट हे शनीच्या विजेच्या वादळांमुळे त्या ग्रहावर येऊन त्यांचे काही खोलीवर हिऱ्यात रूपांतर झाले व नंतर ते पुन्हा वितळून द्रव हिरे बनले आहेत. या ग्रहांच्या गाभ्याजवळ ते असावेत, अशी शक्यता वर्तविण्यता आलेय.