नवी दिल्ली : अमेरिकेच्या मॅडिसन स्क्वेअरवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण रविवारी पार पडलं. यावेळी, मोदींचा या कार्यक्रमाचं रिपोर्टींग करण्यासाठी इथं आलेल्या ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना इथं काही लोकांनी धक्का-बुक्की केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार राजदीप सरदेसाई एका वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करत असताना काही मोदी भक्तांनी मीडियाला ‘मोदीविरोधी’ असल्याचं सांगत गोंधळ घातला. राजदीप यांच्याविरोधात मुर्दाबादच्या जोरदार घोषणाही करण्यात आल्या.
याचाच अवघ्या १० सेकंदाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यावर, विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांनी अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलंय.
घटनेदरम्यान उपस्थित असलेले बहुतांशी लोक मोदी प्रशंसक होते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन केलं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी या धक्काबुक्कीची निंदा केलीय. मोदी यांच्याविरुद्ध काही प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही ठरवत त्यांच्यावर हल्ला करणं योग्य नाही... अशा घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असं त्यांनी म्हटलंय.
राजदीप सरदेसाई यांचं ट्विट...
Super speech by Modi; not so super behaviour by some bhakts. Guess some things won't change.
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) September 28, 2014
Glad we caught the idiots on cam. Only way to shame the mob is to show them. #ModiAtMadison
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) September 28, 2014
व्हिडिओ पाहण्यासाठी -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.