लादेनची १० रहस्य

एक वर्षापूर्वी अफगाणिस्तानातील एका एअरबस स्टेशनवरुन अमेरिकेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी उड्डाण घेतलं..आणि काही वेळातच ते पाकिस्तानातील अबोटाबादमधल्या सैन्य अकादमी जवळ जाऊन पोहोचलं..अमेरिकेच्या कमांडोंनी त्या परिसरातील एका इमारतीवर हल्ला चढवला.

Updated: May 2, 2012, 09:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

एक वर्षापूर्वी अफगाणिस्तानातील एका एअरबस स्टेशनवरुन अमेरिकेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी उड्डाण घेतलं..आणि काही वेळातच ते पाकिस्तानातील अबोटाबादमधल्या सैन्य अकादमी जवळ जाऊन पोहोचलं..अमेरिकेच्या कमांडोंनी त्या परिसरातील एका इमारतीवर हल्ला चढवला..रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अबोटाबादपासून सात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेत एक खबर जाऊन पोहोचली...ती खबर होती जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झाल्याची...ओसामा मारला गेला खरा पण तो आपल्या मागे सोडून गेलाय अनेक रहस्यं...

 

ऑपरेशन 'जेरेनिमा' या नावाखाली अमेरिकेनं केलेली कारवाई हे अमेरिकेचं अलिकडच्या काळातलं सर्वात मोठं यश मानलं जातंय..लादेनचा खात्मा करण्यापूर्वी अमेरिकेच्या कमांडोनी त्याला एक संदेश ऐकवला...पण त्या कारवाईलाही अपयशाची किनार होतीच..

 

हवेलीमुळे कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर ?

दहावर्ष जंगजंग पछाडल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार केलं...बरोबर एका वर्षापूर्वी 1 आणि 2 मेच्या दरम्यान जगातील एक मोठी घटना घडली होती...अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोजनी ते ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलं होतं..मात्र त्या सफल कामगिरीलाही अपयशाची एक बारीक किनार होती..

लादेनचा खातमा करण्यासाठी अमेरिकेनं आखलेल्या ऑपरेशनला सुरुवात झाली आणि त्यांचं ब्लॅक हॉक एमएच - 60 हे हेलिकॉप्टर जमिनीपासून काही फुट उंचीवर असतांना कोसळलं..ही घटना आकाशात दोन मैल उंचीवर असलेल्या अमेरिकेच्या ड्रोन आरक्यू - 170 विमानाने टिपली होती...त्याचवेळी अबोटाबादपासून सात हजार किलोमिटर अंतरावर अमेरिकेतल्या एका कंट्रोलरुममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे ऑपरेशन पडद्यावर पहात होते... ब्लॅक हॉक एमएच - 60 हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं पाहून ओबामा आणि त्यांची टीम अस्वस्थ झाली होती.. ती परिस्थीती पहाताच कंट्रोल रुममध्ये असलेले ऑपरेशन कमांडर मॅकराव्हेन हे सीईए प्रमुख लियोन पनॅटा यांना म्हणाले.. तुम्ही चिंता करु नका, आम्ही हे मिशन पुढे नेहणार असून , प्लॅन 'बी' तयार आहे

प्लॅन 'बी'नुसार दुस-या हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेरिकेचे कमांडो लादेन रहात असलेल्या इमारतीच्या छतावर उतरले..लादेनच्या इमारतीची रचना विशिष्ट प्रकारे करण्यात आली होती..त्यामुळे या ऑपरेशनच्या प्लॅन 'ए'चा पहिला टप्पा अयशस्वी ठरला होता..मात्र लादेन त्या इमारतीत राहात असल्याचा संशय 2011मध्ये अधिकच बळावला होता..

लादेनचा खातमा करण्यासाठी अमेरिकेच्या कमांडोनी अफगाणिस्तानातील एका ठिकाणी लादेनच्या हवेलीची प्रतिकृती तयार करुन तिथं हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं होतं..मात्र त्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या चुकीमुळेच प्रत्यक्ष हल्ल्या दरम्यान अमेरिकेचं हेलिकॉप्टर कोसळल्याचा संशय आहे.. कमांडोंनी प्रशिक्षण घेतांना भिंतींऐवजी काटेरी कुंपनाचा वापर करुन हेलिकॉप्टर लँडिंगचा सराव केला होता..पण प्रत्येक्षात लादेनच्या इमारतीला असलेल्या भिंतींमुळे त्या परिसरातील हवा तापली आणि कमांडोच्या हेलिकॉप्टरचं संतुलन गेलं..अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर क्रॅश करण्यावाचून पायलेट समोर दुसरा पर्य़ाय उरला नव्हता....

 

स्व:तच्या चुकीमुळे मारला गेला लादेन ?

लादेनने जर चूक केली नसती तर कमांडोंनी आखलेला प्लॅन बी ही फसला असता..अबोटाबादमधल्या त्या इमारतीला केवळ एक खिडकी होती आणि त्या खिडकी असलेल्या खोलीत लादेन राहात होता..त्या दिवशी लादेन खिडकी बंद करण्यास विसरला आणि त्याच मार्गाने कामांडो इमारतीत शिरले..धोक्याच्या क्षणी इमारतीच्या छतावर जाण्याचा मार्ग लादेनने तयार करुन ठेवला होता...मात्र कमांडो छात