तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात

शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे. 

Updated: Nov 4, 2015, 09:35 PM IST
तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात  title=

नवी दिल्ली : शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे. 

आदित्यनाथ यांनी शाहरूखची तुलना दहशतवादी हाफीज सईदशी केली आहे. ते म्हणाले की, शाहरुख आणि दहशतवादी हाफिज सईदचे वक्तव्य एकसारखीच आहेत.

भाजप नेते आणि वादग्रस्त विधान असं आता जणू समीकरणच होऊ लागलं आहे. कारण की, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान केली जात आहेत. 
शाहरुखच्या वक्तव्यानंतर आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधान करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. ‘

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर चांगला वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात अन्य पक्षांच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. ‘देशात मोठ्या प्रमाणात असहिष्णुतेचे वातावरण आहे’ असं म्हणत शाहरुखने भाजप नेत्यांना देशद्रोहीही म्हटलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.