www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुरतमध्ये अणुबॉम्बचा स्फोट करण्याचा इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या अहमद झरार सिद्धीबाप्पा म्हणजेच यासिन भटकळचा कट होता, अशी कबुली त्याने नुकतीच इंटरॉगेशनमध्ये दिलीय. ‘एनआयए’कडून भटकळची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानात असलेल्या रियाझ भटकळकडून छोटा अणुबॉम्ब मिळण्याचा यासिनचा प्रयत्न होता... तसं त्याचं फोनवरून संभाषणही झालं होतं. त्यावर रियाझने उत्तर दिलं होतं ‘पाकिस्तानातून काहीही अरेंज होऊ शकेल...’ मात्र ही योजना पूर्णत्वाला आली नाही, कारण त्याचवेळी ‘आयबी’नं यासिनला ट्रॅक केलं होतं.
अणुबॉम्ब मिळवण्यासाठी यासिनने पाकिस्तानातल्या रियाझ भटकळला फोन केला होता. या दोघांमध्ये काय संभाषण झालं ते पाहुयात
यासिन भटकळ : मला पाकिस्तानातून छोटा अणुबॉम्ब मिळेल का?
रियाझ भटकळ : पाकिस्तानातून काहीही मिळू शकेल. अणुबॉम्बच्या साहाय्याने स्फोट घडवता येऊ शकतील.
यासिन भटकळ : सुरतसाठी मला एखादा अणुबॉम्ब हवाय
रियाझ भटकळ : सुरतमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लीम आहेत, तेही या हल्ल्यात बळी पडतील हे लक्षात घ्यायला हवं
यासिन भटकळ : मी मशिदींमध्ये पोस्टर्स चिटकवीन... ज्यात प्रत्येक मुस्लीम कुटुंबानं सुरत शहर गुप्तपणे सोडून जाण्याविषयी लिहिले असेल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.