केजरीवालांना विचारले, कटप्पाने बाहुबलीला का मारले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ‘‘टॉक टु एके’’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

Updated: Jul 17, 2016, 02:01 PM IST
केजरीवालांना विचारले, कटप्पाने बाहुबलीला का मारले? title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ‘‘टॉक टु एके’’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी त्यांना जनतेने अनेक प्रश्नही विचारले. तब्बल १५ हजार नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले. 

एका नागरिकाने त्यांना विचारले की तुम्ही जनतेला इतके मूर्ख का बनवता? तर काहींनी त्यांना चित्रपटाचे रिव्ह्यू सांगण्यास सांगितले. एकाने तर केजरीवाल यांना कटप्पाने बाहुबलीला का मारले असा प्रश्न केला. रुपेश नामदेव असं या व्यक्तीचं नाव आहे.