पाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...

Updated: Oct 16, 2014, 01:15 PM IST
पाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...  title=

नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...  

‘टाईम्स ऑफि इंडिया’नं केलेल्या सर्व्हेनुसार जवळपास ८३.५ टक्के पुरुषांना ‘करिअर ओरिएन्टेड’ मुलगी पत्नी म्हणून आवडेल. ‘करिअर गोल’ असणाऱ्या स्त्रिया पुरुषांचं लक्ष वेधून घेतात.

घरी बसून टीव्हीवर सासू-सुनेच्या सिरिअल्स किंवा रिअॅलिटी शो पाहणाऱ्या स्त्रिया त्यांना रुचत नाहीत. 'कामांच्या कारणांमुळे आम्ही १२ - १३ तास घरात नसू तेव्हा ती घरी बसल्या-बसल्या किती बोअर होईल...' असं कारणंही ते देतात... ८० टक्के पुरुषांनी आपल्याला 'कमी रिअॅलिटी शो' पाहणारी बायको हवीय, असं म्हटलंय. 

मात्र, ती क्रिकेट मॅच पाहणारी असावी... असं मात्र त्यांना वाटतं.... पण, क्रिकेट पाहताना 'क्यूट खेळाडूंचं' कौतुक मात्र करु नये, अशीही पुरुषांची इच्छा दिसतेय. क्रिकेटसोबतच ती न्यूज पाहणारी, न्यूज समजणारी आणि अपडेच घडामोडींचं ज्ञान ठेवणारी असावी, अशीही त्यांची इच्छा या सर्व्हेतून पुढे आलीय. 

मात्र, 'तीनं काम केलं तर ते आमच्या दोघांसाठी चांगलं ठरू शकेल. जर ती नोकरी करणारी असेल तर बचतीतही मदत होईल' असंही ही मुलं म्हणताना दिसतायत.

फोनच्या वापराबाबतीतही पुरुषांच्या आपल्या पत्नीकडून काही अपेक्षा आहेत... त्यांना अशी मुलगी हवीय जी मोबाईलचा कमीत कमी वापर करते.

या सर्व्हेतून आणखी एक गोष्ट पुढे आलीय... ती म्हणजे, आपली 'लाईफ पार्टनर' आपल्यासोबत काम करणारी नसावी... अशीही भारतीय पुरुषांची इच्छा आहे. म्हणजेच, आपल्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुली आपल्या वैयक्तिक जीवनात 'पार्टनर' असण्याबाबतीत भारतीय पुरुषांची अनिच्छा दिसतेय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.