नोकरी देण्याच्या नावाखाली युवतीला २० हजारात विकलं

न्यू फ्रेंडस कॉलनीमध्ये युवतीला २० हजारात खरेदी करून, तिला काही दिवस घरात बंद ठेवणे, खायला न देण्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Dec 26, 2014, 04:52 PM IST
 नोकरी देण्याच्या नावाखाली युवतीला २० हजारात विकलं title=

नवी दिल्ली : न्यू फ्रेंडस कॉलनीमध्ये युवतीला २० हजारात खरेदी करून, तिला काही दिवस घरात बंद ठेवणे, खायला न देण्याचा प्रकार समोर आला आहे.

माहिती मिळाल्यानंतर न्यू फ्रेंडस कॉलनी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी या युवतीची सुटका केली आहे. या युवतीला अनेक दिवस खायला प्यायला देखिल देण्यात आलेलं नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवतीला पश्चिम बंगालहून दिल्लीला आणण्यात आलं, यानंतर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, यातील दिल्लीमधील एका प्लेसमेंट एजन्सीचं नाव समोर येत आहे.

नोकरी देण्याच्या उद्देशाने या युवतीला दिल्लीत आणण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.