VIDEO : 'लालू मुर्दाबाद'... 'झप्पी बाबांची' नितीशकुमारांना पप्पी!

स्वत:ला अंधश्रद्धेचे कट्टर विरोधी म्हणवून घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका तांत्रिकाला शरण गेलेत... आणि हीच दृश्य एका कॅमेऱ्यात कैद झालीत. 

Updated: Oct 24, 2015, 04:21 PM IST
VIDEO : 'लालू मुर्दाबाद'... 'झप्पी बाबांची' नितीशकुमारांना पप्पी! title=

पाटणा : स्वत:ला अंधश्रद्धेचे कट्टर विरोधी म्हणवून घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका तांत्रिकाला शरण गेलेत... आणि हीच दृश्य एका कॅमेऱ्यात कैद झालीत. 

या तांत्रिकाचं नाव 'झप्पी बाबा' असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्या दरबारात मुख्यमंत्री नितीशकुमारही दाखल झाल्यानं या बाबांचा भाव वधारलाय. हा व्हिडिओ नेमका कधी चित्रीत करण्यात आलाय याबद्दल नेमकी माहिती नाही परंतु, त्यानं बिहारचं राजकारणाला मात्र एक वेगळाच तडका दिलाय. 

या व्हिडिओमध्ये एका बंद रुममध्ये बाबांनी नितीश कुमारांच्या कार्याची वाहवा केलीय.. पण लालू प्रसाद यांच्यावर मात्र बाबा नाराज दिसतायत... 'लालू मुर्दाबाद' असे नारेही ते लगावताना दिसत आहेत... आणि मुख्य म्हणजे यावेळी नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू फुलत होतं.  

हा व्हिडिओ भाजप नेते गिरिराज सिंह यांनी ट्विटरवर शेअर केलाय. नितीशकुमारांचा हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर भलताच वायरल होताना दिसतोय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.