www.24taas.com, झी मीडिया, उन्नाव
* किल्ल्याच्या आसपास भारतीय लष्कर तैनात करून उत्खननाचे काम काही तासांत पूर्ण करण्याची संत शोभन सरकार यांची मागणी केंद्र सरकारने फेटाळली आहे.
* खजान्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम करणारी एएसआयची टीम काहीही सांगत नाही आहे. खजान्याबाबत टीममधील सदस्य काहीही सांगण्यास नकार देत आहे.
* उन्नावचे जिल्हाधिकारी व्ही. के. आनंद यांनी सांगितले की, खजान्याच्या शोधात एएसआयच्या १० जणांची टीम काम करीत आहे. खोदकाम संपूर्ण कॅमेऱ्यात टीपण्यात येणार आहे. हे काम सुमारे एक महिना चालणार आहे. खोदकाम जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एएसआयच्या टीमला संपूर्ण सुरक्षा देण्यात येणार आहे.
* एएसआयचे वरिष्ठ अधिकारी प्रविण कुमार मिश्रा यांनी सांगितले की, किल्ल्यामध्ये एक महिना खोदकाम सुरू राहणार आहे. पुरातत्व खाते व्यावसायिक पद्धतीने खोदकाम करणार आहे. संताची भविष्यवाणीशी आमचे काही घेणे देणे नसल्याचेही त्यांनी सांगितले. खोदकाम १० बाय १० च्या घेऱ्यात केले जाणार आहे.
* एएसआय एकीकडे खजिन्याचा शोध करीत आहे तर दुसरीकडे राजा राव राम बक्श सिंह यांच्या आत्माच्या शांतीसाठी हनुमान चालिसा आणि शांती पाठ केला जात आहे. या संदर्भात एक आख्यायिका आहे की, खजिन्यासाठी राज्याची आत्म भटकत आहे.
* दरम्यान उत्तरप्रदेश सरकारनेही खजिन्यावर दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी म्हटले की, खोदकामानंतर जर सोने निघाले तर ते उत्तरप्रदेश सरकारचे असणार आहे.
* खोदकामापूर्वी संत शोभन सरकारने हवन केले.
* किल्ल्यात जाण्यास मनाई करण्यात आली. खोदकाम करण्यापूर्वी त्या ठिकाणी हवन करण्यात आला. पोलिसांनी खोदकामाच्या जागी नाकाबंदी करण्यात आली.
* संत शोभन सरकार यांनी राजा राव रामबक्श सिंह यांच्या किल्ल्यात १००० टन सोने असल्याचे सांगितले. संतांना स्वप्नात हा साक्षात्कार झाल्याचे त्यांनी सांगितले.
* सोन्याचा हा खजिना डोडिया खेडा राज्याचे पंचवीसवे राजा राव राम बक्श सिंह यांच्या किल्ल्यात गाडला गेल्याचे म्हटले जाते. त्यांनी १८५७ ला ब्रिटिशांशी लढाई केली होती. त्यानंतर त्यांना एका झाडाला फाशी देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.