नवी दिल्ली : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. ५९ वर्षांच्या दाऊदचा सगळ्यात ताजा फोटो भारताच्या हाती लागलाय.
'हिंदुस्थान टाइम्स' या इंग्रजी दैनिकाच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आले आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ने दाऊदचा मिशा नसलेला फोटो, मोबाईल बिल, ट्रॅव्हल डाक्युमेंट्स प्रसिद्ध केलेत. दाऊद इब्राहिम कराचीतल्या क्लिफ्टन आणि डिफेन्स परिसरात राहत असल्याचा दावा या वृत्तामधून करण्यात आलाय.
दाऊदची पत्नी महजबीन हिच्या महिन्यांच्या मोबाईल बिलाचा पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागलाय. या फोन बिलमध्ये क्लिफ्टन परिसराचा पत्ता आहे.. कराचीमध्ये राहत असलेल्या दाऊदकडे तीन पासपोर्ट असल्याचाही दावा यात करण्यात आलाय.
अधिक वाचा : दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा
दाऊद, दाऊदची पत्नी आणि मुलं अनेकदा कराचीतून दुबई आणि दुबईहून कराचीला गेल्याचं या दस्तावेजांमधून स्पष्ट होतंय. त्यामुळं दाऊद आपल्या भूमीवर नसल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल झालीय. भारत आणि पाकिस्तान एनएसए बैठकीत हाच मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.