नवी दिल्ली : जो पर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत नाहीत, तो पर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा बलवंत कुमार यांनी घेतली होती, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रतिज्ञा घेणारे बलवंत सिंह यांची आज मोदींशी भेट झाली, यानंतर मोदींनी त्यांना चप्पल घालण्याचं आवाहन केलं.
बलवंत सिंह दोन वर्षापासून चप्पल वापरत नव्हते. पीएम नरेंद्र मोदी यांनी बलवंत सिंह यांना शाबासकी दिली असली, तरी भविष्यात अशा कोणतीही प्रतिज्ञा घेऊ नये ज्यामुळे तुम्हाला शारिरिक नुकसान होईल.
अरविंद भोसले यांचा रेकॉर्ड ९ वर्षाचा
शिवसेनेचे कार्यकर्ते अरविंद भोसले यांनी देखिल अशीच प्रतिज्ञा घेतली होती. २००५ साली सिंधुदुर्ग विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेवर मात केली.
तेव्हापासून अरविंद भोसले यांनी पायातील जोड्यांचा त्याग केला होता. जो पर्यंत भगवा फडकत नाही तोपर्यंत आपण चप्पल घालणार नसल्याचं त्यांनी ठरवलं होतं, यानंतर मात्र २०१५ मध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर अरविंद भोसले यांनी ९ वर्षानंतर चप्पल घातली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.