Jagannath Rath Yatra 2024 : भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का? 'हे' आहे मुख्य कारण

Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. जगन्नाथ पुरी चार धामांपैकी एक असून भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का हे तुम्हाला माहितीय का?

नेहा चौधरी | Updated: Jul 1, 2024, 08:22 PM IST
Jagannath Rath Yatra 2024 : भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का? 'हे' आहे मुख्य कारण title=
Jagannath Rath Yatra 2024 Why is Lord Jagannath idol incomplete This is the main reason read mythology

Jagannath Rath Yatra 2024 : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होणार आहे. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ओडिशातील पुरीमधील जगन्नाथ मंदिरातून मोठ्या थाटामाट्यात आणि भव्य रथ यात्रा काढली जाते. यंदा जगन्नाथ यात्रा 07 जुलै 2024 ते 16 जुलै 2024 या काळात असणार आहे. जगन्नाथ, बलराम आणि आई सुभद्रा यांचे रथ दोरीच्या साहाय्याने मंदिरातून खेचत बाहेर काढला जातो. या मूर्तींबद्दल एक विशिष्ट आहे. भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्राजींच्या मूर्तींना हात, पाय आणि नखे का नाहीत हे तुम्हाला माहिती आहे का? (Jagannath Rath Yatra 2024 Why is Lord Jagannath idol incomplete This is the main reason read mythology)

...म्हणून या मूर्ती अपूर्ण! 

पौराणिक कथेनुसार, एकदा विश्वकर्मा स्वतः भगवान जगन्नाथ, बलराम आणि माता सुभद्रा यांच्या मूर्ती बनवत होते. यावेळी विश्वकर्माजींनी तत्कालीन राजाला सांगितलं की, तिन्ही मूर्ती तयार होईपर्यंत त्या खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही, याची काळजी घ्या. राजाने भगवान विश्वकर्माच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून त्या खोलीचं दार उघडलं, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी त्या मूर्तींचं बांधकाम अपूर्ण सोडलं. यामुळेच आजही भगवान जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रा जी यांच्या मूर्ती अपूर्ण आहेत. तरीही भाविक या मूर्तींची पूजा पूर्ण भक्तीभावाने करतात. 

रथयात्रेमधील भगवान जगन्नाथ तसंच बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे भगवान जगन्नाथाचा रंग गडद आहे, त्याचप्रमाणे त्यांची मूर्ती बनवतानाही अशा कडुलिंबाच्या लाकडाची निवड करण्यात आलीय. त्याचप्रमाणे बलराम जी आणि बहिण सुभद्रा जी यांच्या मूर्तीसाठी लाकूड देखील त्यांच्या रंगानुसार निवडण्यात आला आहे. 

नारळाच्या लाकडाचा रथ

या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथाची खास गोष्ट म्हणजे हे रथ नारळाच्या लाकडापासून तयार करण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथाच्या रथाचा रंग लाल आणि पिवळा असतो. याशिवाय इतर रथांपेक्षा हा रथ आकाराने मोठा पाहिला मिळतो. या प्रवासात भगवान जगन्नाथाचा रथ समोर असतो आणि त्यानंतर बलभद्र आणि सुभद्राचा रथ असतो. हा सोहळा पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.