www.24taas.com, वृत्तसंस्था, उन्नाव/ उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंडियाखेडी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत २५ सेंटीमीटर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या खोदकामात नाही सोने मिळाले तर सोने मिळण्याची शक्यता नाही. उन्नावचे उप जिल्हाधिकारी विजय शंकर दुबे यांनी सांगितले, दौंडियाखेडा स्थित राजा राव रामबख्श सिंह यांचा खंडरनुमा किल्ला आहे. या किल्ल्यावर सहा दिवसात २५ सेंटीमीटर खोदकाम झाले आहे. आतापर्य़ंत २.१७ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामात काचेच्या बांगड्या, भांड्याचे काही तुकडे, मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. याला पुरातन महत्व असू शकते. याशिवाय घोड्याचे पाय, छोटे कासवाचा सांगाडा, तुटलेल्या बांगड्या आणि एक घर चूल सापडली आहे, अशी माहिती दुबे यांनी दिली.
याआधीच्या खोदकामात प्राचीन भींत, खांबचा भाग, मातीची तुटलेली भांडी, लोखंडाच्या चाव्या सापडल्यात. याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे. सध्या तरी या वस्तूंना पुरातन महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. या खोदकामाच्यावेळी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.
तसेच खोदाई करण्यात येत असलेल्या भागात बॅरीकेटींग लावण्यात आले आहे. तसेच येथे मीडियाला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, सोने मिळण्याची शक्यता कमी असल्याने लोकांची गर्दी कमी होऊ लागली आहे. सध्याच्या गर्दीच्या ठिकाणी केवळ पोलीस आणि स्थानिक मीडियाचे कर्मचारी दिसत आहेत. या ठिकाणी स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय पोलीस दलाचे १७५ जवान २४ तास नजर ठेवून आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.