www.24taas.com ,चेन्नई
श्रीलंकेत तमिळ भाषिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आज सामान्य नागरिकांसोबत टॉलिवूडही रस्त्यावर उतरलेलं दिसलं. तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेते आणि इतर प्रतिनिधी एक दिवसीय उपोषणाला बसले आहेत. या निदर्शनामध्ये अभिनेता रजनीकांतही सहभागी झाला होता.
चेन्नईत श्रीलंकेविरोधात तसंच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंविरुद्ध जोरदार निदर्शनं सुरु आहेत. श्रीलंकेविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रजनिकांत थेट आंदोलकांमध्ये जाऊन बसला. लंकेतल्या तामिळ नागरिकांप्रती सहानुभूती असल्याचं त्यानं दाखवून दिलंय.
आज झालेल्या आंदोलनामध्ये टॉलीवूडमधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, वितरक आणि प्रदर्शक या सगळ्यांनी या एक दिवसीय उपोषणामध्ये भाग घेतला असून ‘साऊथ इंडीयन फिल्म आर्टिस्ट असोसिएशन’च्या परिसरात हे उपोषण चालू आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आर. सरथ कुमार, अजिथ कुमार आणि सूर्या यांनीही या निदर्शनात सहभाग घेतला. वेगवेगळ्या वर्गांतील महत्त्वाच्या लोकांनीही भाग घेतला होता. त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या आंदोलनाचं नेतृत्व आर. सारथ यांनी केलं.