'मॅनेजमेंट कोट्याची' चौकशी करायला गेले आणि ४ लाख गमावले

'लालसा अत्यंत वाईट गोष्ट' असं अनेकदा तुम्ही ऐकलचं असेल... पण, हा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय हैदराबादमधल्या एका शिक्षिकेनं... 

Updated: Jul 21, 2015, 05:06 PM IST
'मॅनेजमेंट कोट्याची' चौकशी करायला गेले आणि ४ लाख गमावले title=
प्रातिनिधिक फोटो

हैदराबाद : 'लालसा अत्यंत वाईट गोष्ट' असं अनेकदा तुम्ही ऐकलचं असेल... पण, हा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय हैदराबादमधल्या एका शिक्षिकेनं... 

सोमवारी सकाळी विकाराबादमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय स्वर्णा रेखा आपल्या मोठी बहिण संध्या रेखा (६० वर्ष) तसंच भाऊ सुधाकर आणि संध्याची मुलगी श्रद्धा यांच्यासोबत दिलकुशनगर स्थित एका खाजगी शिक्षण संस्थेत काही कामानिमित्तानं गेल्या होत्या. स्वर्णा रेखा या निवृत्त शिक्षिका आहेत. 

स्वर्णा यांना गाडीत सोडून बाकी सगळे जण संस्थेत मॅनेजमेंट कोट्याच्या जागांविषयी चौकशी करण्यासाठी गेले. कारमध्ये एका बॅगीत १५ तोळं सोनं आणि २० तोळं चांदीचे दागिने ठेवलेले होते. तर कारच्या डिक्कीतही ४० लाख रुपये ठेवलेले होते. 

यावेळी, स्वर्ण रेखा यांना रस्त्यावर १०-१० रुपयांच्या काही नोटा रस्त्यावर पडलेल्या स्वर्णा यांना दिसल्या. यामुळे, स्वर्णा कारमधून खाली उतरून नोटा उचलू लागल्या. तेव्हाच त्यांची नजर गाडीकडे गेली. गाडीतून दागिने घेऊन पसार होताना काही जण त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली पण व्यर्थ... 
 
सीसीटीव्हीमध्ये हा चोर कैद झालाय पण त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसू शकलेला नाही. 

एवढे दागिने आणि पैसे कॉलेजमध्ये का आणले? या प्रश्नावर 'श्रद्धाचं अॅडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये झाल्यावर सल्लागाराला भेट म्हणून देण्यासाठी हे दागिने आणि पैसे बाळगले होते... गरज पडल्यास सोनं गहाण टाकायचीही कुटुंबाची तयारी होती' असं या कुटुंबानं म्हटलंय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.