स्पेनच्या टेलेगो ट्रेनची पहिली चाचणी पूर्ण

Updated: May 29, 2016, 11:04 PM IST
स्पेनच्या टेलेगो ट्रेनची पहिली चाचणी पूर्ण title=
बरेली : स्पेनहून आयात केलेल्या टेलेगो ट्रेनची पहिली चाचणी आज उत्तर प्रदेशातल्या बरेली आणि मुरादाबाद दरम्यान यशस्वी झाली. यावेळी पाच डब्यांची गाडी बरेलीहून ताशी 115 किलोमीटर वेगानं मुरादाबादला पोहचली.  यानंतर पुढच्या चाचणीत मथुरा ते पलवल आणि दिल्ली-मुंबई मार्गावर ताशी 180 किमी वेगानं टेलेगोची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात ताशी 200 ते 250 किमी वेगानं धावण्याची क्षमता टेलेगोमध्ये आहे. शिवाय ही ट्रेन चालवण्यासाठी सध्याच्या इंधनापेक्षा 30 टक्के कमी इंधन लागतं.
रविवारी झालेल्या चाचणीत डब्यांमध्ये वजनी पोती भरण्यात आली होती. टेलगोच्या डब्ब्यांचं वजन कमी असतं. शिवाय वळणदार रुळांवरूनही वेगात प्रवास करता येईल यासाठी टेलेगोचं डिझाईन करण्यात आलंय.