शिवपाल यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, मुलायम सिंह असतील अध्यक्ष

समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव आणि त्यांचा भाचा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद सर्व देशाने पाहिला. पण हा वाद आता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. बुधवारी अखिलेश कुमार यांना इशारा देणाऱ्या शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

Updated: May 5, 2017, 01:38 PM IST
शिवपाल यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, मुलायम सिंह असतील अध्यक्ष title=

लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव आणि त्यांचा भाचा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद सर्व देशाने पाहिला. पण हा वाद आता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. बुधवारी अखिलेश कुमार यांना इशारा देणाऱ्या शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

एएनआयशी बोलतांना शिवपाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, या पक्षाचं नाव समाजवादी सेक्यूलर मोर्चा असं असेल आणि पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव असतील.

बुधवारी शिवपाल यांनी म्हटलं होतं की तीन महिन्यात ते अध्यक्ष पद मुलायम सिंह यादव यांना सोपणार आहेत किंवा ते नवीन पक्ष बनवतील.