रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात

रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 4, 2016, 03:25 PM IST
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात title=

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

उर्जित पटेल यांचे हे पहिले पतधोरण जाहीर झाले. या पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली. नवा रेपो दर ६.२५ टक्के इतका असेल. याशिवाय, रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के इतका करण्यात आला असून बँक रेट ६.७५ टक्के इतका ठेवण्याचा निर्णय पतधोरण समितीने घेतला आहे. 

पतधोरण समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे चौथे द्विमासिक पतधोरण आहे. यंदा मात्र पतधोरणाकरिता सरकारने सहा सदस्यांची नियुक्ती केली असून तिचे अध्यक्षपद गव्हर्नरांकडे देण्यात आले आहे. असे असले तरी व्याजदराबाबत समितीतील गव्हर्नर वगळता अन्य पाच सदस्यांना निर्णय अधिकार आहेत.