जयललिता रुग्णालयात, प्रकृतीबद्दल माहिती द्या : मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याने एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयने याची दखल घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्रीबाबत विचारणा केली? 

Updated: Oct 4, 2016, 03:00 PM IST
जयललिता रुग्णालयात, प्रकृतीबद्दल माहिती द्या : मद्रास उच्च न्यायालय title=

चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याने एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयने याची दखल घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्रीबाबत विचारणा केली? 

जयललिता यांच्या तब्येतीबाबत उद्या बुधवारपर्यंत सविस्तर माहिती द्यावी, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. जयललिता यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण याबद्दल सरकारकडून कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे एका कार्यकर्त्यांने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, डीएमडीकेचे नेते कॅप्टन विजयकांत यांनीही काल जयललिता यांची प्रकृतीची सध्यस्थिती काय आहे, हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी केली होती.

जयललिता रुग्णालयात दाखल असल्यामुळे सरकारचे कामकाज कोण पाहात आहे, असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. ट्रॅफिक रामास्वामी यांनी मंगळवारी यासंदर्भात उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. वास्तविक ही याचिका मंगळवारी सुनावणीसाठी येणार नव्हती. पण रामास्वामी यांनी या प्रकरणी आजच सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

जयललिता यांना १२ दिवसांपूर्वी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या मेडीकल बुलेटिनमध्ये जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे. त्यांना आवश्यक प्रतिजैविकी, श्वासोच्छवासाठी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांच्या तब्येतीवर लक्ष देण्यासाठी इंग्लंडमधून एक तज्ज्ञ डॉक्टरही येथे आले आहेत, असे रुग्णालयाने म्हटले आहे.