रतन टाटांनी ममता बॅनर्जींचे कान टोचले, पण...

जंटलमन रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना पहिल्यांदा टीकेचा सामना करावा लागतोय. रतन टाटांनी ममता बॅनर्जी यांना विकासाबाबत नरेंद्र मोदी यांचा धडा घेण्याचा सल्ला दिला होता.

Updated: Aug 8, 2014, 08:08 AM IST
रतन टाटांनी ममता बॅनर्जींचे कान टोचले, पण... title=

कोलकाता : जंटलमन रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना पहिल्यांदा टीकेचा सामना करावा लागतोय. रतन टाटांनी ममता बॅनर्जी यांना विकासाबाबत नरेंद्र मोदी यांचा धडा घेण्याचा सल्ला दिला होता.

या वक्तव्यावर पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रतन टाटा हे बहुधा मानसिक आजाराने ग्रस्त असावेत, त्यामुळेच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचे मित्रा म्हणाले आहेत.  
 
रतन टाटांनी या आधी बुधवारी पश्चिम बंगालसंदर्भात आपले मत मांडले होते. रतन टाटा म्हणाले होते, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कोलाकात्याचा लंडनप्रमाणे विकास करण्याचे आश्वासन दिले होते. पण शक्य नाही. राज्यात कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास झालेला पाहायला मिळत नाही, तसे संकेतही नाहीत. त्याउलट मोदींनी गुजरातचा जो कायापालट केला, त्यातून धडा घेण्याचा सल्ला टाटा यांनी दिला होता.
 
एका कार्यक्रमानिमित्त कोलाकात्याला आले असता टाटा यांनी आपली परखड मते मांडली. टाटांना यावेळी जीवनातील एक सुखद आणि एक दुःखद घटना विचारण्यात आली होती. त्यावर पुण्यातील कामगारांच्या मुद्यातून सावरत असतानाच सिंगूरचा वाद समोर उभा राहिल्याचे ते म्हणाले. हा सर्वात मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला संपूर्ण कारखानाच दुस-या ठिकाणी हलवावा लागणार होता. त्यात मोठा धोका होता. आम्ही सुमारे तीन लाख नॅनोसाठी ऑर्डर घेतलेली होती. ग्राहकांनी पूर्ण रक्कमही भरलेली होती. त्यामुळे आमच्यावर मोठा दबाव होता. या सर्व वादात उत्पादनात एक वर्ष विलंब झाला. त्यामुळे उत्साह मावळत गेला आणि एकूणच सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम झाला, असे टाटांनी सांगितले.  यानंतर गुरुवारी अमित मित्रा यांनी टाटांच्या विरोधात टीका केली.
 
मित्रांनी टाटांवर काय टीका केली?
मित्रांनी जंटलमन रतन टाटांवर खरमरीत टीका केली आहे. रतन टाटांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत असावा. आजुबाजुला काय घडते आहे, हे त्यांना कळत नाही, असे मला वाटते. टाटा समुहातील कंपनी असणारी टीसीएस येथे सुमारे 20,000 रोजगारांची निर्मिती करत आहे. तसेच अंबानी आणि इमामी ग्रुप येथे सिमेंट उद्योग उभारण्याच्या तयारीत आहेत, असे मित्रा यांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.