रेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून

रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.

Updated: Dec 20, 2015, 11:13 PM IST
रेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून title=

पाटणा : रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.

टवाळांच्या या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर थेट रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाला ट्विटरवरुन तक्रार केली.

पाटण्यावरुन येणाऱ्या श्रमजीवी एक्सप्रेसच्या एस ११ या डब्यातून, पीडित मुलगी दिल्लीसाठी एकटीच प्रवास करत होती. तेव्हा काही रोमियोंनी गर्दीचा फायदा घेत तिला छेडायला सुरुवात केली. 

सुरेश प्रभूंनी याची दखल घेत अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. यानंतर श्रमजीवी एक्सप्रेस, आरा स्थानकावर थांबवून पीडित मुलीची तक्रार नोंदवण्यात आली, आणि तिला आरक्षित सीट उपलब्ध करुन दिली गेली, अशी माहिती दानपूर रेल्वे विभागाचे प्रवक्ते संदीप कुमार सिंह यांनी दिली. 

लखनऊ येथे झालेल्या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची रेल्वेत गर्दी होती. यामुळे एस-११ या रेल्वेच्या आरक्षित डब्यात काही विना आरक्षित प्रवासी घुसले. काही मवाली मुलंही या रेल्वेच्या डब्यात चढले आणि गर्दीचा फायदा उचलत ते मुलीची छेड काढू लागले. 

विरोध करुनही ते बधले नाहीत. त्यामुळे पीडित मुलीने तक्ररार करण्यासाठी ट्विटरची मदत घेतली. गाडी थांबताच पोलीस डब्यात आले आणि छेड काढणाऱ्या मवाल्यांनी तिथून पळ काढला. याचवेळी विना आरक्षीत लोकांनाही गाडीतून खाली उतरवण्यात आले.