नवी दिल्ली : डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्यात आता चांगलीच लढाई पहायला मिळणार आहे. अरुण जेटली यांनी म्हटलं की ते अरविंद केजरीवाल आणि इतर काही आप नेत्यांविरोधात मानहानीची केस करणार आहेत.
अरुण जेटली यांनी म्हटलं की 'मी माझ्या कायदे सल्लागारांना केजरीवाल आणि इतर नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.'