दहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ

विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 2, 2014, 07:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलेंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलेंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
अनुदानित सिलेंडरचे दर साधारण ४५० रुपयांपर्यंत आहेत. तर विनाअनुदानित सिलेंडर १ हजार २१ रूपयांना आहे. आता या दरांमध्ये वाढ केल्यामुळं विनाअनुदानित सिलेंडर १२६४ रूपयांना पडणार आहे.
यामुळं महागाईनं त्रस्त सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडणार आहे. ही नवी दरवाढ काल रात्रीपासूनच लागू करण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.