नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगेच्या अस्सी घाटावर जाऊन पूजा केली आणि यानंतर त्या परिसरातील सफाईही केली. पंतप्रधान आधी अस्सी घाटावर पोहचले त्याठिकाणी त्यांनी वैदिक मंत्रोच्चाराबरोबर गंगेच्या आराधना केली. जवळापस 12 मिनिटं त्यांनी गंगेची आराधान केली.
गंगेच्या आराधनेनंतर मोदींनी आसपासच्या परिसरातील सफाई केली. यानंतर आपल्या स्वच्छता मोहिमेतील नऊरत्नांची घोषणा केली. पहिलं नाव त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं घेतलं. त्याचप्रमाणे चित्रकार के राम भट्टाचार्य, भाजप नेता मनोज तिवारी, मनु शर्मा, क्रिकेटर सुरेश रैना, मोहम्मद कैफ, देवी प्रसाद दिवेदी आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही पंतप्रधान मोदींनी नॉमिनेट केलं.
पंतप्रधान मोदी सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी खासदार आदर्श गाव योजने अंतर्गत जयापूर हे गाव दत्तक घेतले आहे. आज सकाळी ते वाराणसीतील प्रसिद्ध अस्सी घाटावर पोहचले. त्यांनी त्याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेपूर्वी पंतप्रधानांनी गंगा पूजनही केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.