हे काय... नरेंद्र मोदींसमोर सचिनची चमक पडली फिकी

असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि लोकांची गर्दी त्याच्या आजूबाजूला नाहीय. बुधवारी असं घडलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सचिन तेंडुलकरची चमक जरा फिकी पडलेली दिसली. 

Updated: Oct 9, 2014, 08:15 AM IST
हे काय... नरेंद्र मोदींसमोर सचिनची चमक पडली फिकी title=

नवी दिल्ली: असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि लोकांची गर्दी त्याच्या आजूबाजूला नाहीय. बुधवारी असं घडलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सचिन तेंडुलकरची चमक जरा फिकी पडलेली दिसली. 

बुधवारी संध्याकाळी वायुसेना प्रमुखांच्या घरी वायुसेना दिनाच्या कार्यक्रमाला सचिन जरा वेगळाच बसला होता. तर पंतप्रधान मोदींच्या भोवती फोटो काढण्यासाठी आणि भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 

वायुसेनेचे ऑनरेरी ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच वायुसेना दिवसाच्या परेडमध्ये सहभागी झाला. वायुसेनाच्या अॅट होम कार्यक्रमादरम्यान जेव्हा सचिन त्याची पत्नी अंजली सोबत पोहोचला. तेव्हा वायुसेनेचे अनेक अधिकारी आणि त्यांचं कुटुंब सचिनसोबत फोटो काढत होते. मात्र जशी मोदींची एंट्री झाली सर्वांचं लक्ष पंतप्रधानांकडे गेलं.  

हे खरंय पंतप्रधान पहिले सचिनलाच भेटले. त्यानंतर ते मंचावरून जेव्हा खाली उतरले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. तर सचिन मंचावर एका कॉर्नरमध्ये बसून दिसला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.