नवी दिल्ली : मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारतीय मंगळयानाने मंगळ ग्रहाचा एक आणखी सुंदर फोटो पाठवला आहे. हा फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये आपल्याला सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ दिसत आहे. लाल ग्रहाच्या या फोटोमध्ये ग्रहाचे उंचवटे आणि पठार स्पष्ट दिसत आहेत.
इस्रोनुसार ६६ हजार ५४३ किलोमीटरवरून काढण्यात आलेल्या या फोटोत एलिसियम ज्वालामुखीचे क्षेत्र दिसत आहे. हा दक्षिणेकडील काळ्या क्षेत्रात आहे. एलिसियम मंगळ ग्रहातील दुसरा सर्वात मोठे ज्वालामुखी क्षेत्र आहे.
मंगळावर अनेक ज्वालामुखी सक्रीय आहेत आणि ते निरंतर लावा रस उत्सर्जित करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.