पाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी

पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.

Updated: Feb 27, 2016, 06:17 PM IST
पाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी title=

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.

कंदील म्हणते की, 'आम्ही पाकिस्तानी खूपच प्रेमळ लोक आहोत. आमचा तिरस्कारावर विश्वास नाही, प्रेमावरच आम्ही विश्वास ठेवतो. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणूनच राहा. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. जर आम्हाला राग आला, तर तुमच्यापैकी कुणीही राहणार नाही. त्यामुळे तुम्ही चहा प्या आणि लोकांना चहा पाजा'.

कंदील बलोच ही या माध्यमातून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतेय पण एका देशाच्या पंतप्रधानाबद्दल असं बोलणं नक्कीच असमर्थनीय आहे. या व्हिडिओची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे तर अभिनेत्रीवर टीकेची झोड उठू लागली आहे.

पाहा व्हिडिओ