कंदिल घेऊन बनारसला जाणार - लालू प्रसाद यादव

बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितिश कुमारच असतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिले. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा आहेत. 

Updated: Nov 8, 2015, 06:06 PM IST
कंदिल घेऊन बनारसला जाणार - लालू प्रसाद यादव title=

पाटणा : बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितिश कुमारच असतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिले. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा आहेत. 

मात्र लालूंनी निवडणुकीपूर्वीच जाहीर केलं होतं, आमच्या पक्षाच्या जास्त जागा आल्या, तरी मुख्यमंत्रीपदी नितिश कुमारच असणार आहेत. नितिश कुमारे हेच पुढील मुख्यमंत्री असतील असं लालूंनी स्वत:हून स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीपूर्वी आपण चंग बांधला होता, की दिल्लीला स्वस्थ बसू देणार नाही, यासाठी आपण जनआंदोलन छेडणार आहोत, पंतप्रधानांचा मतदार संघ बनारसमध्ये आपण लालटेन म्हणजेच कंदील घेऊन जाणार असल्याचंही लालूंनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.