भूसंपादन विधेयकात काही बदल करण्याची तयारी : मोदी

भूसंपादन विधेयकात योग्य बदल करण्यास आम्ही तयार आहोत,  भूसंपादन विधेयकाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र असे समज कृपया पसरवू नका,  असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलंय.

Updated: Mar 3, 2015, 07:18 PM IST
भूसंपादन विधेयकात काही बदल करण्याची तयारी : मोदी title=

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकात योग्य बदल करण्यास आम्ही तयार आहोत,  भूसंपादन विधेयकाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र असे समज कृपया पसरवू नका,  असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलंय.

 
शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात मिळाणाऱ्या मोबदल्यामध्ये कपात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या मोबदल्यात अजिबात कपात होणार नाही, नसल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
 
तसंच आधारकार्ड योजना काँग्रेसची असली, तरी त्याची यशस्वी अंमलबजावणी भाजपनंच केल्याचा दावाही पंतप्रधनांनी केला आहे.

यावेळी भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी काँग्रेसनं एसआयटीची जाणूनबुजून स्थापना केली नाही, असा घणाघात पंतप्रधानांनी काँग्रेसवर केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.