नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतनून गेल्या आठवड्यात एका सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येच्या आरोपात एका संशयिताला अटक करण्यात आली. २३ वर्षीय बस क्लिनर रविंद्र कुमारनं पोलिसांसमोर असा धक्कादायक खुलासा केलाय, की जे ऐकून आपला चांगलाच थरकाप उडेल.
लहान मुलांना चॉकलेट आणि इतर आमिष देत तो त्यांचं अपहरण करायचा. एव्हढ्यावर रविंद्र न थांबता मुलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहासोबत आपली कामेच्छा पूर्ण करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र कुमार चॉकलेटच्या बहाण्यानं सुनसान भागात लहान मुलांना न्यायचा. त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करायचा. मात्र अनेक प्रकरणांमध्ये रविंद्रनं पहिले लहान मुलांची हत्या करून नंतर त्यांच्या मृतदेहावर अत्याचार केल्याचं त्यानं कबुल केलंय.
आतापर्यंत जवळपास १५ मुलांची हत्या त्यानं केलीय. रविंद्र लहान मुलं आणि मुली दोघांनाही आपला शिकार बनवायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रनं २००८मध्ये पहिल्यांदा हे क्रूर कृत्य केलं. तेव्हा तो १६ वर्षांचा होता. २००९मध्ये त्यानं विजय विहारमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहावर बळजबरी केली. २०११मध्ये त्यानं कंझावला आणि मुंडका भागात तीन वर्षीय आणि दोन वर्षीय मुलींना आपली शिकार बनवलं. २०१३मध्ये रविंद्र अलिगढमध्ये आपल्या नातेवाईकांकडे लग्नसमारंभाला गेला होता. तिथे त्यानं पाच मुलांवर बलात्कार केला. अलिगढमध्येच त्यानं एका मुलाची हत्या केली होती. त्याप्रकरणी तिथं गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंह यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये राहणारा रविंद्र कुमारनं पोलिसांना सांगितलं की, तो दिल्ली, एनसीआर आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या मुलींना शिकार बनवत होता. कुमार सध्या दिल्लीतील उत्सव विहारच्या करालामध्ये राहत होता.
पोलीस उपायुक्त सिंह यांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबुल करत हा भीषण खुलासा केला. त्यानं २००९ पासून आतापर्यंत कमीतकमी १४ मुलींवर अत्याचार आणि हत्या केलीय. आम्ही त्याला खूप फोटो दाखवले. त्यातील समयपूर बादली इथल्या मुलीची त्यानं ओळख पटवली. २०१२मध्ये त्यानं त्यामुलीवर बलात्कार करून हत्या केली होती.
सध्या आरोपी रविंद्र कुमार याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत. त्याचं ब्रेन मॅपिंग होईल. रविंद्र कुमारला रविवारी दिल्लीतील बेगमपूर भागातून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. मुलगी १४ जुलैपासून बेपत्ता होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.