दिल्लीमध्ये पहिले आम आदमी क्लिनिक

दिल्लीतील पिरागढी मदत छावणीत 'आप'ने पहिले आम आदमी क्लिनिक सुरू केले.या क्लिनिकमध्ये रूग्णांना उपयोगी अशा सगळ्या तऱ्हेच्या सुविधा असणार आहेत. 

Updated: Jul 20, 2015, 02:45 PM IST
दिल्लीमध्ये पहिले आम आदमी क्लिनिक  title=

नवी दिल्ली : दिल्लीतील पिरागढी मदत छावणीत 'आप'ने पहिले आम आदमी क्लिनिक सुरू केले.या क्लिनिकमध्ये रूग्णांना उपयोगी अशा सगळ्या तऱ्हेच्या सुविधा असणार आहेत. 

यात रक्त तपासणी करण्यापासून ते ईसीजीपर्यंत सगळ्या सुविधा असणार आहेत. या क्लिनिकद्वारे आधुनिक सुविधा देऊन चांगले आरोग्य देण्याचा आमचा मानस आहे असे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितले.

तसेच प्राथमिक स्वास्थ सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून १ हजार क्लिनिक्स उघडणार आहे. बजेटमध्ये याची घोषणा झाली आहे. एका वर्षात ही क्लिनिक्स उघडणार असून ७० विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १५ क्लिनिक उघडणार आहेत.

केजरीवाल यांच्या मते ९५ टक्के रुग्णांचे उपचार या क्लिनिकमध्ये होऊ शकतात. यामुळे इतर हॉस्पिटलमध्ये होणारी गर्दी कमी होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.