पोलिसांनी ‘SMART’ होण्याची गरज – पंतप्रधान

देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम असायला हवी, ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम त्यांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावं लागत नाही. शस्त्र कोणाच्या हाती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आसाममधील गुवाहाटी इथं सुरु असलेल्या ४९व्या राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेस पंतप्रधान संबोधित करत होते. 

Updated: Nov 30, 2014, 12:22 PM IST
पोलिसांनी ‘SMART’ होण्याची गरज – पंतप्रधान  title=

गुवाहाटी: देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम असायला हवी, ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम त्यांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावं लागत नाही. शस्त्र कोणाच्या हाती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आसाममधील गुवाहाटी इथं सुरु असलेल्या ४९व्या राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेस पंतप्रधान संबोधित करत होते. 

चित्रपटांनी पोलिसांची प्रतिमा मलिन, पोलिसांनी स्मार्ट होण्याची गरज असल्याची अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. 

SMART – 

  • संवेदनशील आणि शिस्तबद्ध (S)
  • आधुनिक आणि सतर्क (M)
  •  सावध आणि जबाबदार(A)
  • प्रतिसादात्मक आणि विश्वासू (R)
  • टेक सॅव्ही आणि प्रशिक्षित (T)

 
या परिषदेमध्ये सन्मानित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केलं. ही महत्त्वपूर्ण परिषद राजधानी दिल्लीऐवजी गुवाहाटी इथं घेतल्यानं रुढ पायंडा मोडला गेल्याचं निरीक्षण मोदी यांनी यावेळी नोंदविलं. याचबरोबर, देशाच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ट गुप्तचर जाळ्याची अत्यंत गरज असल्याचं मोदी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं. 

“गुवाहाटी इथं ही परिषद घेतली गेल्यानं ईशान्य भारतासाठी सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रोत्साहनात्मक वातावरण तयार होईल. स्वातंत्र्यानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी देशासाठी स्वत:च्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. त्यांचा हा त्याग व्यर्थ जाऊ देता कामा नये. त्यांचा हा त्याग आमच्यासाठी अमूल्य आहे,‘‘ असं पंतप्रधान म्हणाले. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील परिषदेस उपस्थित होते. शनिवारी या परिसदेमध्ये बोलताना सिंह यांनी इसिस आणि दहशतवाद यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. भारताच्या अंतर्गत सुरक्षेस दहशतवाद, नक्षलवाद आणि इतर अशा स्वरुपाच्या असलेल्या अनेक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.