इंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय. 

Updated: Apr 6, 2015, 09:15 AM IST
इंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा title=
सौजन्य फेसबुक -मुख्यमंत्री

नवी दिल्ली: इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरुन पंतप्रधान मोदींनी आदेश देत याबाबत पुढाकार घेतला आणि पंतप्रधानांच्याच उपस्थितीत हा करार झाला. केंद्र सरकारच्या मान्यतेनं एनटीसी ही जागा राज्य सरकारला हस्तांतरीत करणार आहे. या बदल्यात राज्य सरकार या जागेचा मोबदला एनटीसीला देईल. हा मोबदला ठरवण्यासाठी आणि हे हस्तांतरण सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत आणि स्मारकाच्या भूमीपूजनाला येण्याचीही विनंती केली.

जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर योग्य तारीख निश्चित करुन भूमिपूजन सोहळ्याला नक्की येऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.